तसा मी bore होतो

 तसा मी खूपच bore होतो
थोडा shy आणि, थोडा… bore च होतो !!

कधीच कुठल्या परीक्षेत पहिला नव्हतो
आणि तरीही कधी शेवटी नव्हतो

कोणत्याच शिक्षकाच्या डोळ्यात नव्हतो ,
आणि गप्पा मारायला back bencher ही नव्हतो !

मस्ती करायला पण daring लागतं
वर्गात गुंड बनायलाही धैर्य लागतं

मी कुणाच्याच अध्यात किव्वा मध्यात नव्हतो
मित्र होते, भांडणं होती.. पण तरीही फार सामान्य होतो

मला कधी पारिजातक कळला नाही
रातराणी फुललेलीही मला कधीच दिसली नाही

मनाला चाफा दिसला म्हणून सुख नव्हतं
की कुठल्याशा सांद्र स्वरांनी येणारं दुख्खही नव्हतं

एकदम सोपा सरळ कारभार होता
आणि स्वच्छ निर्मल अज्ञानाचा आनंद होता

मग कधीतरी नकळतच आयुष्य सुरु झालं
मतं आली, विचार आले, आणि ते बालपण संपून गेलं

आताही मी कोणीच नव्हतो
पण आता त्याच्या जाणीवेने बेजार होतो

कोणीतरी बनायची धडपड होती
पण त्यातच मनाची फरफटही होती

विचार येतात म्हणून तसं वागता येत नाही
मनात दडलेल्या इच्छांना तसेही कुठे स्थान नाही

या इच्छांचा, या विचारांचा काही resume नसतो
यशवेड्या दुनियेत यासाठी कोणालाच वेळ नसतो

आजही मी तसाच आहे
बाहेरून थोडा आणि मनातून… तसा bore च आहे !!

Comments

Popular posts from this blog

मत हस

एहसास

कल