Posts

Showing posts from October, 2010

प्रत्येकाचं एक जग असतं

 प्रत्येकाचं एक जग असतं,
मऊ उबदार पांघरुणात विसावलेलं
आणि तसंच त्याचं एक मन असतं,
आपल्याच आठवणींमध्ये हरवलेलं

प्रत्येकाचं एक मत असतं,
स्वतःलाच बरोबर मानून चालणारं ,
आणि प्रत्येकाचं एक कारण असतं
त्याला कधी कधी भांडायला लावणारं

प्रत्येकाचं एक रूप असतं
स्वतःच्याच प्रेमात पाडणारं,
आणि तसंच एक प्रतिबिंब असतं,
त्यालाच बुचकळ्यात टाकणारं

प्रत्येकाचं एक कर्म असतं
त्याला भोगायला लावणारं,
आणि तसंच एक नशीब असतं
त्याला जन्मभर ढकलणारं

प्रत्येकाचं एक यश असतं
त्यालाच खूप सुखावणारं,
आणि तसंच एक दुख्ख असतं
फक्त त्यालाच खलणारं

प्रत्येकाचं अस्तित्व म्हणजे एक पोतं असतं
आपापल्या या गोष्टी भरून नेणारं,
आणि माणूस हे फक्त एक गाढव असतं
हे सारं ओझं वहावणारं …!

Read More..