बोरीवली ते चर्चगेट
बोरीवलीहून गाडी निघाली
मग आली कांदिवली
मालाडला गर्दी चढली
गोरेगावला आणखी वाढली
जोगेश्वरी आपली येऊन गेली
अंधेरीला सर्व उतरली
विलेपार्ल्याला मंडळी स्थिरावली
आणि सांताक्रूझला पुन्हा त्रासली
खारपर्यंत कशीबशी मावली
बांद्र्याला त्रासून उतरली
माहीम माटुंग्याला हूल दिली
आणि दादरला गजबजली
एल्फिन्स्टनला थांबली
आणि परेल पर्यंत हळू हळू गेली
महालक्ष्मी कधी नाही पावली
बॉम्बे सेन्ट्रलला लोक उतरली
ग्रांट रोड आणि चर्नी रोडला शांत झाली
मरीन लाइनच्या मैदानाबाहेरून चालली
आणि मधेच थांबली
दहा मिनटांनी परत निघाली
आणि शेवटी चर्चगेटला दमली
……
माणसं घामानी भिजलेली
उतरली आणि चालू लागली …